Total Pageviews

Wednesday, May 15, 2013

" दिन रात तुला मी "

कादंबर्या वाचण्याचा छंद जरी नसला तरी हे पुस्तक नक्कीच वाचा " दिन रात तुला मी ", विजय तरवडे ... फारच लाईट पण मनावर ठसे उमटवणारी अशी काही क्षण. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाचे काही असे क्षण असतात कि कितीहि  सुख लाभो कुठे तरी आतुर इच्छा बाकीच असते.  " दिन रात तुला मी " , यात विजय तरवडे यांनी आपल्या काही दिवाळी अंकातील  विशेष लेख   घेतले आहेत. प्रत्येक लेखात एक विलक्षण आकर्षण आहे गुंतवून ठेवण्याचा.

पुण्यातील पुरा पासून तर हल्लीच्या पुण्याबद्दलचे बारकाईने केलेले निरीक्षण दिसते.प्रत्येक लेखात एक वेगळ्या अश्या  अबोल प्रेमाचा ,  आईच्या मायेचा , नोकरीच्या दगादगित कुठे तरी विसावा देणारी क्षण,  शाळेतील मज्जा . म्हणजे आपण या लेखात नक्कीच स्वतःला शोधून काढू .. स्वतःला नाही तर किमान आपल्या काही भावना ज्यांना आपण कधीच व्यक्त होऊ दिला नाही त्या इकडे नक्कीच कोणी तरी आपल्या साठीच लिहलं असावा, असं वाटतं.

वर्षांतर  - -  यातील पुराचे वर्णन आणि शाळेतील खोडकर मुले इतकाच नव्हे तर पुरातही मज्जा घेणारी लोक आणि पुराने दुखावलेल्यालोकांच्या मनाचे दर्शन.   दिन रात तुला मी, या लेखात सुंदर अशी अबोल प्रेमाचा स्पर्श. पाऊस, नोकरीत बदलीच्या वैताग तरी सुद्धा ज्या व्यक्ती मुले आपली बदली चुकली तीच व्यक्ती मनाच्या कोपर्यात कुठे तरी दाटून बसलेली.  बर्याचदा अश्या गोष्टींना " Extra marital Affairs" असे संबोधले जाते. पण त्या इतक्या लवचिक पणे मांडल्या आहेत कि काही चुकीचं असं वाटत नाही.

स्त्री पुरुषाच्या आयुष्यात आकार्षाना पलीकडेही फार मोठं एक  नातं असतं, म्हणूनच निसर्गाने या दोघांच्या बंधनात अनेक नाते गुंफावली आहेत. मैत्री, द्वेष, अपुरं प्रेम,   आयुष्याचा मोह, असमाधानी मन, पण तरीही हसतमुख चेहरा. हेच आयुष्य आहे. वाचता वाचता फार काही शिकून जातो आपण . बर्याच चुळबुळ करणाऱ्या भावनांना योग्य स्थान मनात मिळून जाते , वाचता वाचता लेख का संपलं असंही वाटतं.  आणि मग मनाच्या कोप्य्रातील  आपल्या काही गोष्टींवर आपण नक्कीच खुदकन हसू.



Book Review : " दिन रात तुला मी "

Tejashri Pratap Pratibha Kamble

 

No comments:

Post a Comment